आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षांनंतर चिमुकल्या आराध्याला हृदय मिळाले; फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या दीड वर्षांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवी मुंबईतील 4 वर्षांच्या आराध्याला 14 महिन्यांच्या ब्रेनडेड झालेल्या बाळाचं हृदय मिळाले आहे. आराध्याचे हृदय निकामी झाल्याने तिला हृदयदात्याची प्रतीक्षा होती. 
 
कुठे मिळाले हृदय
आराध्याला हवे असलेलं हृदय सुरतच्या एका रुग्णालयात मिळाले. आराध्याचे वडील योगेश मुळे गेल्या दीड वर्षांपासून हृदयाच्या शोधात होते. यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मोहिमही राबवण्यात आली. अनेक दिग्गजांनी अवयवदानाबद्दल जनजागृती केली. अखेर आराध्याच्या आयुष्यात तो दिवस आला, ज्याची तिला दीड वर्षांपासून प्रतीक्षा होती.
सुरतहून हृदय मुंबईत आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला. सकाळी 9 वाजता आराध्यावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली. सूरतच्या एका ब्रेनडेड झालेल्या 14 महिन्यांच्या बाळाच्या अवयवदानानंतर आराध्याला हृदय मिळाले. या बाळाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अवयवदानाबाबत कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
 
आराध्याचं हृदय करत होते फक्त 10 टक्के काम
या दिवसाची गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षा होती. हृदयासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात आवाहन करण्यात आले. मात्र आराध्याला हवे असलेले हृदय मिळत नव्हते. अखेर सुरतहून तो फोन आला, ज्याची दीड वर्षांपासून वाट पाहत होतो, अशी भावना योगेश मुळे यांनी व्यक्त केली.
आराध्याला एप्रिल 2016 ला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचं हृदय फक्त 10 टक्के काम करत होते, असे आढळून आले होते. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...