आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Are You Know National Anthem ?, High Court Ask To State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला राष्‍ट्रगीत माहीत आहे काय?, राज्याला उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘10वी, 12 वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राष्‍ट्रगीतात बदल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला राष्‍ट्रगीत तरी माहिती आहे काय?’ अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला फटकारले. या प्रकरणी राज्य सरकार व गृह मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना 2 ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


मुलूंड येथील शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्या दक्षता शेठ यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातील राष्‍ट्रगीतात ‘सिंध’च्या ऐवजी ‘सिंधू’ असा चुकीचा उल्लेख आहे. तसेच बारावीच्या भौतिक, रसायन, जीवशास्त्र व गणितांच्या पुस्तकातही असाच चुकीचा उल्लेख आहे. या प्रकरणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील दोषी अधिकार-यांवर गुन्हे दाखल करावेत व चुकीचा उल्लेख असलेली सर्व पुस्तके बाजारातून परत मागवून नष्ट करावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व एस. सी. गुप्ता यांच्या पीठासमोर शुक्रवारी या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी अतिरिक्त सरकारी वकिल अभिनंदन वाग्यानी यांनी सांगितले की, सुमारे या विषयांची सुमारे 7 लाख पुस्तके छापण्यात आली आहेत, त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल. यावर न्यायालयाने सरकारला चांगलेच सुनावले.


काय म्हणाले न्यायालय?
* सरकारला राष्‍ट्रगीत तरी माहीत आहे काय?
* त्यात बदल करणे सुरू करू नका. तसे करण्याचा उद्देश काय?