आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argument Between BJP And Shivsena Over Jai Vidarbha Slogan

'जय विदर्भ'वरून भाजप-सेनेत सामना, घोषणा कामकाजातून काढून टाकण्याचे अध्यक्षांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
मुंबई - विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करत दुसरा दिवसही गाजवला. "जय विदर्भ' अशा सभागृहात घोषणा देणा-या भाजपच्या आमदारांवर कारवाईची मागणी करत शिवसेनेने भाजप विरोधाचा आपला हेका कायम ठेवला. शिवसेनेच्या मागणीनंतर "जय विदर्भ’च्या घोषणा कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय हंगामी अध्यक्ष पांडू जीवा गावित यांनी घेतला.

नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीच्या दुस-या दिवशी नागपूरमधील भाजपचे आमदार अशिष देशमुख यांनी शपथ घेताना ‘जय विदर्भ’ अशी घोषणा केल्याने शिवसेनेने या मुद्द्याला हरकत घेतली. अगोदरच सत्ता सहभागावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मानापमानाचे नाट्य सुरू असतानाच झालेल्या या घटनेमुळे या दोन्ही पक्षांदरम्यान पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली. शिवसेनेचे गटनेते एकनाथ िशंदेंनी ‘जय विदर्भ’ ही घोषणा म्हणजे फुटीरतावादी भावना असल्याचे सांगत शिवसेना नेहमीच अखंड महाराष्ट्राच्या बाजुने असेल असे स्पष्ट केले. तसेच भाजप आमदारांवर कारवाईची मागणी केली.

यावर भाजपचे काही आमदारही सभागृहात आक्रमक झाले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजीला सुरूवात होताच हंगामी अध्यक्ष पांडू जीवा गावित यांनी मध्यस्थी करत ‘जय विदर्भ’बाबतचा तपशील कामकाजातून काढत असल्याचा निर्णय दिला. शिवाय यानंतरही कोणी ‘जय विदर्भ’ची घोषणा दिली तर अधिवेशन कालावधीपर्यंत संबंधित सदस्यांचे निलंबन करण्यात येईल असे निर्देशही दिले. त्यामुळे शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत भाजपला खिजवण्याची संधी साधली. भाजपनेही मग जोरदार घोषणाबाजी केल्याने काहीवेळ सभागृहात गोंधळाचे वातावरण होते.

शिवसेनेच्या भूमिकेकडे राष्ट्रवादीचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यात बुधवारी विश्वासदर्शक ठराव व अध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाची भूमिका काय असावी, याबाबत पवारांनी मार्गदर्शन केले. तटस्थ, गैरहजर राहणे की मतदान करणे, अशा तीन पर्यायावर पवार आमदारांशी बोलले. बुधवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावली आहे. भाजप िशवसेनेला सत्तेत सहभागी करून घेते की नाही, यावरच या बैठकीत राष्ट्रवादीची पुढील रणनिती ठरवली जाणार आहे. शिवसेना विराेधी पक्षात बसल्यास भाजपला पाठिंबा देण्यास आम्ही माेकळे, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने स्पष्ट केले.