आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरिजितचे शुल्क सर्वाधिक 5 लाख, 2 कोटी ‘व्ह्यू’सह बादशहा सर्वात हिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मर्सी’ या बादशहाच्या गाण्याला रिलीज झाल्यानंतर ४८ तासांतच दीड कोटी व्ह्यूज मिळाले. यूट्यूबवर १४ दिवसांत ते २.७० कोटी वेळा पाहिला गेला; पण गायकांत सर्वात आघाडीवर कोण, या प्रश्नाचे उत्तर आहे अरिजित सिंह. शुल्काच्या बाबतीत अरिजित सर्वात आघाडीवर आहे. तो एका गाण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत शुल्क घेतो. त्या तुलनेत बादशहाचे एका गाण्याचे शुल्क आहे सुमारे ३ लाख रुपये. २०१६ मध्ये बादशहाची पाच गाणी चार्टबस्टरमध्ये होती, त्यात टॉपवर होते ‘कपूर अँड सन्स’चे ‘लडकी ब्यूटिफुल’ हे गाणे. २०१५ मध्येही अरिजितचे गाणे टॉपवर नव्हते. तेव्हा अंकित तिवारीच्या ‘रॉय’ या चित्रपटाचे ‘तू है कि नहीं’ हे गाणे टॉपवर होते. दोन वर्षांत महिला गायिकांचे फक्त एक-एक गाणेच टॉप १० मध्ये समाविष्ट होते. २०१५ मध्ये कनिका कपूरचे ‘चिट्टियां कलाइयां’ आणि २०१६ मध्ये श्रेया घोषालचे ‘दिवानी मस्तानी.’  
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इतर गायक किती पैसे घेतात घेतात आणि कोण आहे गायिंकामध्ये टॉप लिस्टवर आणि अरजीत सिंहचे कोणते गाणे आहेत टॉपवर...
 
 

 
बातम्या आणखी आहेत...