आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज मंत्रिमंडळात; दुसऱ्यांदा संधी, खाेतकरांना पक्षनिष्ठेचे फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची अखेर मंत्रिमंडळात वर्णी लागली. तशी अधिकृत घोषणाच उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री केली. पक्षसंघटना वाढीसाठी खोतकरांनी जो संघर्ष केला त्याचे फळ म्हणून त्यांचा दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी १९९५ ला युतीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले होते.
सत्तेत शिवसेना सहभागी असतानाही शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतानाच राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून तोडीस तोड काम केल्याचे फळ म्हणून खोतकर यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. यापूर्वी १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते.

मराठवाड्यात शिवसेनेने पाय रोवण्यास सुरुवात केली तेव्हा जालना शहरात शिवसेना वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक आणि आक्रमक नेता अशी आमदार अर्जुन खोतकर यांची ओळख आहे. त्यामुळेच १९९० ला ऐन पंचवीशीतच त्यांची जालना विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर १९९५ आणि २००४ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघाऐवजी घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र तेथे त्यांचा पराभव झाला. परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा जालना मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते येथून विजयी झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांचाही विश्वास त्यांनी संपादन केला. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा जालना येथे झाली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर आवाज उठवण्यासाठी या सभेला आक्रोश मेळावा, असे नाव देण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या या सभेनंतरच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांचा अावाज राज्य आणि देशपातळीवर पोहोचला. त्यानंतरच मराठवाड्यात केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणी व मदतीचही घोषणा केली. या सभेला संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी आणि शिवसैनिकांची गर्दी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवल्या. २०१३ मधील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना परभणी मतदारसंघातून तयारी करण्याचे संकेत दिले होते. तेव्हा त्यांनी संपूर्ण परभणी मतदारसंघ पिंजून काढला, तेथील समस्यांना वाचा फोडली. मात्र, ऐनवेळी त्यांना परभणीतून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी निराश न होता जाेमाने काम करीत ही जागा शिवसेनेला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने जालना मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा पराभव करून चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

फडणवीस सरकार मंत्रिमंडळात पहिल्याच यादीत त्यांना कॅबिनेटमंत्री पद मिळेल, असा विश्वास जालना जिल्ह्यातील शिवसैनिक व्यक्त करत होते; मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतरही त्यांनी निराश न होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अावाज उठवला. अधिवेशनातील त्यांच्या भाषणांची सरकारला वेळोवेळी दखल घ्यावी लागली. शिवसेना सत्तेत असतानाही आमदार खोतकर यांनी अनेक वेळा सरकारला धारवेर धरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, शिवजलक्रांतीचे मोठे काम

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...