आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्जुन खोतकरांची एसीबी नव्हे, मुख्य सचिवांद्वारे चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी असताना ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ने केल्यानंतर या प्रकरणी मुख्य सचिवांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी खोतकर प्रकरणी एसीबीमार्फत चौकशी केली जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, मुख्य सचिवांद्वारे ही चौकशी होणार असल्याचे शनिवारी स्प्ष्ट झाले. आपच्या आरोपांनंतर स्वतः खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती. आपच्या प्रीती शर्मा मेनन यांनी खोतकरांच्या निकटवर्तीयांच्या नावावर जालन्यात बाजार समितीचे २५० गाळे असल्याचे म्हटले होते. मात्र, खोतकर यांनी यासंबंधीचे पुरावे व कागदपत्रे मुख्यमंत्र्यांकडे सादर करून सखोल चौकशी करण्याची मागणी स्वत: केली होती.
बातम्या आणखी आहेत...