आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arjun Rampal Summoned By Mumbai Police For Meeting Jailed Gangster Arun Gawli

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅंगस्टर अरूण गवळीला परवानगीशिवाय भेटल्याने अभिनेता अर्जुन रामपालला नोटिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गॅंगस्टर अरुण गवळी यांची भेट घेतल्याने बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल याला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहे. मुंबईतील जे जे पोलिस स्टेशनमधील अधिका-यांना माहिती मिळाली की, अर्जुन रामपाल याने डिसेंबर महिन्यात जे जे रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
अर्जून रामपाल हा 'डॅडी' नावाच्या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात अर्जुन डॅडी म्हणजेच अरूण गवळींची भूमिका साकारत आहे. गेल्या वर्षी 29 डिसेंबर जे जे रूग्णालयात जाऊन डॉन गवळीसोबत एक तास चर्चा केली होती.
पोलिसांचे म्हणणे आहे की, जानेवारी महिन्यातच रामपाल याला समन्स पाठवले होते. याबाबत सांगितले जात आहे की, अर्जुन रामपाल याने अरूण गवळीची परवानगीशिवाय भेट घेतली.
2008 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलकार जमसांडेकर यांच्या हत्या प्रकरणी डॉन अरूण गवळी दोषी आढळला आहे व त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. गवळीला रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात आणले गेले होते. त्याचवेळी रामपालने गवळीशी भेट घेतली होती. त्यावेळी गवळी न्यायालयीन कोठडीत होता.
दुसरीकडे, मुंबईतील तळोजा जेलमधून गवळींना जे जे रूग्णालयात घेऊन आलेल्या पोलिस कर्मचा-यांची चौकशी करण्यात येणार आहे.