आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करभरती पेपर फुटीप्रकरणी आणखी तीन जण अटकेत, तिघेही लष्कराशी संबंधित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - लष्कर भरती पेपर फुटीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी तीन जणांना नागपूर आणि नाशिक येथून अटक केली अाहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्याची संख्या २१ झाली आहे. न्यायालयाने या सर्वांना चार मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी अटक केलेल्या तीन अाराेपींत बीएसएफचा जवान, एक लष्करी जवान आणि एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे.   
 
लष्करातील पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र करत सध्या मेघालय येथे कार्यरत असलेला सीमा सुरक्षा दलाचा जवान रणजित जाधव व पुण्यातील खडकी येथे लष्करी सेवेत असलेला आणखी एक संशयित महेंद्र सोनावणे याला अटक केली अाहे. या शिवाय रामप्पा गुंडप्पा पटोले नामक एका माजी लष्करी अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. 
 
गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले की, ‘या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते. विशेष करून लष्करी सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यात सहभागी असण्याचीअधिक शक्यता आहे. रविवारी झालेला पेपर हा शनिवारी रात्री साधारण दाेन वाजण्याच्या सुमारास परीक्षार्थींच्या व्हाॅट्सअॅपवर उपलब्ध झाला हाेता. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक असल्याचे निदर्शनास आले अाहे.’
  
अटक केलेले अाराेपी  
{ किरण अशोक गामणे (वय ३२, वारेदारना, निफाड, जिल्हा नाशिक)   
{ महेंद्र चंद्रभान सोनावणे (३१, खडकी पुणे)   
{ संतोष भीमराव शिंदे (३२, फलटण, जिल्हा सातारा)    
{ संदीप सदाशिव फडतरे ( २७, शेटफळ, पंढरपूर)   
{ प्रसाद ज्ञानदेव धनोटे (२९, राहता  जिल्हा नगर)   
{ सुभाष गुलाबराव निर्मळे ( ५०, अकोला)   
{ वैभव भास्कर शेवरे (३३, बुळगाव, कवठेमहाकाळ)    
{ जयकुमार शंकर बेलखेडे (३१, कारंजा जिल्हा वर्धा)   
{ संदीप दौलत भुजबळ (२६, नाशिक रोड)   
{ संदीप बबन नागरे ( ३२, वारेदारना, निफाड, जिल्हा नाशिक)   
{ रणजित मोहन जाधव (२७, फलटण जिल्हा सातारा)   
{ वैभव आंनदा वडर (२४, बहादूरवाडी, जिल्हा सांगवी)   
{ धनाजी ऊर्फ अप्पा मोहन जाधव (३२, मठाचीवाडी, फलटण, जिल्हा सातारा),    
{ गणेश तुकाराम नरसाळे (२०, करमाळा, जिल्हा सोलापूर)   
{ संतोष अप्पासाहेब बर्गे (३७, भोसरी, पुणे )   
{ अक्षय पोपट साबळे (२४, घाडगेवाडी, बारामती)   
{ रामाप्पा लुंडप्पा पटोळे (४८, दिघी, पुणे)   
{ गणेश प्रकाश गायकवाड (२२, खानापूर, जिल्हा सांगली)   
{ तुषार दत्तात्रय इंगळे, (२१, फलटण जि. सातारा)   
{ सोमनाथ शिवाजी सव्वाशे ( २१, कोडेज, करमाळा, जिल्हा सोलापूर)   
{ संदीप कांतीलाल शितोळे (३८, चिखली, जिल्हा पुणे)
बातम्या आणखी आहेत...