आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी अजूनही त्यांचा यूनिफॉर्म धुतला नाही' शहीदच्या पत्नीने लिहिली भावुक FB पोस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये थलसेनाच्या यूनिटवर झालेल्या हल्ल्यामध्ये मेजर अक्षय गिरीश(31) कुमार शहीद झाले होते. त्यांच्या पत्नीने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, जे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी लव्ह लाइफपासून वाईट दिवसांविषयी लिहिले आहे.
- मेजर अक्षयच्या पत्नी संगीता यांनी फेसबुकच्या बीइंग यू वर एक पोस्ट शेयर केली आहे.
- मेजरचे कुटूंब काश्मीरच्या नगरोटामध्ये राहत होते. ते बेंगलुरुच्या कोरमंगलाच्या भागात राहायचे.
- या दोघांना चार वर्षांची एक मुलगी आहे. तर अक्षयचे वडिल वायुसेनाचे पायलट होते.
#फेसबुकवर लिहिली भावनिक पोस्ट
आमची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती. मी एका फ्रेंडसोबत चंदीगढमध्ये गेले होते. तिथून आम्ही शिमल्याला गेलो. परंतु तेथे कर्फ्यू लागला होता. बुक केलेले हॉटेलही बंद झाले होते. यावेळी अक्षय अंगठी घेणेही विसरले होते. तेव्हा त्यांनी मला गुडघ्यांवर बसून लाल रंगाचा पेन देऊन प्रपोज केले होते. 2011 मध्ये आमचे लग्न झाले आणि आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. लग्नाच्या दोन वर्षांनंतर आम्हाला मुलगी झाली. तिचे नाव नैना आहे.
- यानंतर अक्षय आपल्या प्रोफेशनल असायनमेंटसाठी दिर्घकाळासाठी निघून गेले. 
- 2016 मध्ये जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये अक्षयची पोस्टिंग झाली आणि आम्हीही तेथे गेलो. 
- त्याच वर्षी 29 नोव्हेंबरच्या सकाळी 5.30 वाजता फायरिंगचा आवाज आला आम्ही जागे झालो. आम्हाला वाटले ट्रेनिंग सुरु आहे. परंतु असे काही नव्हते. काही वेळानंतर ग्रेनेड फुटण्याचा आवाज आला. 5.45 वाजता एक ज्यूनियर आमच्याकडे आला आणि आतकवाद्यांनी तोफखाण्याच्या रेजिमेंटला डांबून ठेवले आहे. लवकर कपडे बदला. 
- सर्व महिला आणि मुलांना एका खोलीत ठेवण्यात आले. सतत फायरिंगचा आवाज येत होता. यावेळी मी माझ्या सासूला मॅसेज केला होता आणि बंगलुरुमधील नणदेसोबत बोलले होते. सकाळ उजाडताच आम्हाला एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. 
- दुपार झाली तरी अक्षयविषयी काही माहिती मिळाली नव्हती. मला भीती वाटत होती. मी 11.30 वाजता एक फोन करायला सांगितला. 
- त्यांच्या टिमच्या एका सदस्याने फोन उचलला आणि सांगितले की, अक्षय वेगळ्या ठिकाणी गेले आहेत. संध्याकाळी 6:15 वाजता त्यांचे कमांडिंग आणि काही ऑफीसर्स मला भेटायला आले. त्यांनी मला सांगितले की, मॅडम आपण अक्षयला गमावले आहे. ते सकाळी 8:30 वाजता शहीद झाले होते. हे ऐकताच माझे आयुष्य संपले. मी विचार करत होते की, जर मी जाताना त्यांना अलविदा म्हणून मिठी मारली असती तर... मी त्यांना सांगितले असते की, मी तुमच्या खुप प्रेम करते... परंतु आपण असा वाईट विचार आपण कधीच करत नाही. आता मी एका लहान बाळासारखी उदास झाले. माझ्या शरीरातून प्राण काढून घेतलेय असे मला वाटत होते. दोन इतर सैनिकही शहीद झाले होते. 
#यूनिफॉर्म आजही तसाच सांभाळून ठेवलाय
- मी त्यांचा यूनिफॉर्म, कपडे सर्व मला मिळाले. आम्ही हे सर्व सांभाळून ठेवले होते. मी त्यांचा रेजिमेंट जॅकेट अजूनही धुतला नाही. मला जेव्हा खुप आठवण येते तेव्हा मी तो घालून घेते. यामध्ये अजूनही अक्षयचा सुगंध येतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...