आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईपासून 200 किलोमीटरवर धडधडल्या तोफा; लष्कराचे शक्तिप्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्सरसाइजमध्ये सहभागी झालेले कॅडेट्स व जवान - Divya Marathi
एक्सरसाइजमध्ये सहभागी झालेले कॅडेट्स व जवान
मुंबई/नाशिक- मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर असलेला डोंगराळप्रदेश... पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले लक्ष्य... क्षणाचाही विलंब होता जवानांची शिस्तबद्ध हालचाल... आदेश मिळताच लक्ष्यावर अचूक निशाणा... लक्ष्य क्षणात दिसेनासे होणे.. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नव्हे, तर देवळाली येथील लष्कराच्या जवानांनी ‘सर्वत्रा प्रहार’च्या माध्यमातून दाखवून दिलेली क्षमता होय. केवळ जवानच नाही, तर ज्या तोफांच्या ताकदीवर आपली सुरक्षा अवलंबून आहे, त्यांचे महत्त्व उपस्थितांना अनुभवायला मिळाले.

देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने सोमवारी शिंगवेबहुला गावाजवळील लष्करी हद्दीत ‘सर्वत्रा प्रहार’ हा साहसी दृश्याचा कार्यक्रम झाला. ‘सर्वत्रा प्रहार’च्या सुरुवातीला चीता आणि चेतक या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने आणली गेलेली तोफ आणि जवान, ज्या ठिकाणी वाहने जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी घोड्याचा वापर, तोफांची होणारी वाहतूक, पूर्ण वर्तुळाकार फिरणारी तोफ, वाहनांवर असणाऱ्या तोफा यांच्या माध्यमातून लक्ष्यावर अचूक मारा करून दुश्मनांवर कसा मारा केला जातो, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एवढेच नाही, तर लष्करात महत्त्वपूर्ण भूमिका असणारे चीता आणि चेतक हेलिकॉप्टरच्या थरारक दृश्यांनंतर उपस्थितांच्या मनात धस्स करण्यास भाग पाडले, तर शत्रूच्या परिसरात लपून जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेऊन तेथून धूम ठोकणारे हेलिकॉप्टरचे दृश्य तर अप्रतिम होते.

त्याचप्रमाणे पाचशे ते सहाशे मीटर उंचीहून उडी मारून पॅराशूटच्या साहाय्याने आपल्या हव्या त्या ठिकाणावर उतरणारे जवानांच्या कसरती पाहून उपस्थितांना प्रत्यक्ष रणांगणावर घडणाऱ्या युद्धाची आठवण झाली. जवानांची शिस्त, धाडस पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून पाणी आले. पण त्यांच्या कार्याला टाळ्या वाजवून दाद देण्यात आली. प्रमुख पाहुणे जे जॉर्ज (व्हीएमएम), कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी उपस्थित होते. या वेळी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पुणे, परिसरातील शाळेतील विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, एनडीए, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना लष्कराची ताकद दाखविण्यासाठी समावून घेतले होते.

या तोफांद्वारे प्रात्यक्षिके
ब्रान्ट मॉर्टर्स (120 एमएम), सॉल्टम गन्स (150 एमएम), इंडियन फिल्ड गन्स (105 एमएम), लाइट फिल्ड गन्स (105 एमएम), मीडियम गन्स (130 एमएम), एफ एच 77 बी बोफोर्स (155 एमएम) आणि मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर ग्रॅड बीएम 21 (122 एमएम).

पुढील स्लाइडवर पाहा, लष्कराच्या शक्तिप्रदर्शनाचे फोटोज....