आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

147 नगराध्यक्षांचा अाज हाेणार फैसला, नगर परिषद व नगर पंचायतींसाठी 70% मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील २५ जिल्ह्यांमधील १६४ नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि १४७ थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी रविवारी सरासरी ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. साेमवारी सकाळपासून मतमाेजणी सुरू हाेईल व दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील.

राज्यात पहिल्या टप्प्यातील १४७ नगर परिषदा व १७ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. नगर परिषद व नगर पंचायतींच्या सदस्य पदाच्या एकूण ३ हजार ७०५; तर थेट नगराध्यक्षपदांच्या १४७ जागांसाठी मतदारांनी मतदान केले. त्यासाठी सात हजार ६४१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. निकालानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी : मराठवाडा-जालना (चार)- ५९ %, परभणी (७)- ७६, हिंगोली (३)- ६८, बीड (६)- ७४ व उस्मानाबाद (८)- ६८. पालघर जिल्हा (३ पालिका)- ८० टक्के, रायगड (नऊ)- ८८%, रत्नागिरी (पाच)- ८८ % व सिंधुदुर्ग (चार)- ६७%. सातारा (१४ पालिका) - ८३% सांगली (अाठ )- ८४ %, सोलापूर (नऊ)- ७३ % व कोल्हापूर (नऊ)- ७९ %, नाशिक (सहा)- ७९ %, धुळे (दाेन)- ७०%, नंदुरबार (एक)- ७४%, जळगाव (१३)- ६८ % व अहमदनगर (अाठ)- ८३%.अमरावती (नऊ)- ७२%, अकोला (पाच )- ६७ %, बुलडाणा (नऊ)- ७९ %, वाशीम (तीन)- ६४%, यवतमाळ (अाठ)- ६० % वर्धा (सहा)- ६०%, चंद्रपूर (पाच)- ६३ %. एकूण सरासरी- (१६४)- ७० %

शिवसैनिकांकडून मतदान यंत्राची तोडफोड
बुलडाणा येथील एका मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा संशय घेत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आपल्या काही सहकाऱ्यांसह ११/३ क्रमांकाच्या मतदान केंद्रात शिरले व मतदान यंत्राच्या तोडफोडीचा प्रयत्न केला.

मुरुममध्ये दगडफेक - उस्मानाबाद मुरूम येथे मतदारांना पैसे वाटण्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत शनिवारी झालेली हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक झाली. या प्रकरणी आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांच्यासह ३७ कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवून २७ जणांना अटक केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...