आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस-राष्ट्रवादीचा \'आक्रोश\', भाजप-शिवसेनेचा \'जल्लोष\'! काँग्रेस तिसऱ्या तर राष्ट्रवादी चाैथ्या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात सोमवारी आक्रोश सुरू असतानाच राज्यातील २५ जिल्ह्यांतील १६४ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची पीछेहाट करत प्रत्यक्ष आक्रोशाचीच वेळ आणली. या निवडणुकीत थेट नगराध्यक्षांची ५२ पदे व नगरसेवकांची ८५१ पदे जिंकून भाजपने पहिल्या क्रमांकावर जोरदार मुसंडी मारली. त्याखालोखाल २६ नगराध्यक्षपदे जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेस तिसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेस चाैथ्या क्रमांकावर फेकली गेली आह

एकीकडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,माजी मुख्यमंत्री नारायण राणे ,विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ यांची आपापल्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला लागली असताना त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला.

२०११ मध्ये नगरसेवकांच्या संख्येच्यानुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने नगरसेवकनिहाय आकडेवारीच्या आघाडीवर आणि थेट नगराध्यक्षांच्या आघाडीवरही राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे भाजपने आता तळागाळातही आपले बस्तान उत्तमरीत्या मांडल्याचे स्पष्ट झाले. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत २९८ जागांवर असलेला भाजप आता ८८१ जागांवर पोहोचला असून १४७ पैकी किमान ५१ शहरांमध्ये भाजपचे थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पक्षाची ही वाढ तिपटीने झाले असून नगराध्यक्षांच्या संख्येत तर किमान १० पट वाढ झाल्याचे चित्र आहे.

शिवसेनेनेही २६४ जागांवरून ४०२ जागा गाठून प्रगती साध्य केली असली तरी एकूण आकडेवारीत या पक्षाने मात्र चौथा क्रमांक पटकावला आहे. पक्षाच्यावतीने उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. त्याउलट मुख्यमंत्री आणि अन्य भाजप मंत्र्यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला होता.

काँग्रेस चौथ्या स्थानावर घसरली : लोकसभा आणि विधानसभेत प्रचंड घसरण झालेली काँग्रेस २०११ मध्ये ७७१ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. ती आता ४०८ सदस्यांसह तिसऱ्याक्रमांकावर घसरली. काँग्रेसची ताकद निम्म्याने कमी झाली आहे.

पुढे वाचा... पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...