आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arrange Help Compensation For The Acid Attack Victims

अ‍ॅसिड हल्ले : योजना दोन महिन्यांत आखा, हायकोर्टाचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बलात्कार, लैंगिक छळ तसेच अ‍ॅसिड हल्ल्यांमधील पीडित मुलींना भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यासंबंधीची योजना दोन महिन्यांत आखावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सरकारने अशा गंभीर मुद्द्यावर संवेदनशीलता दाखवावी, असा सल्लाही न्यायालयाने दिला.

महिलांच्या छळाविरुद्ध स्थापन करण्यात आलेल्या एका संस्थेने ही याचिका दाखल केली आहे. ‘लैंगिक तसेच शारीरिक छळाच्या शिकार ठरलेल्या महिलांबद्दल सरकारने संवेदनशील व्हावे. याबाबत एक ठोस योजना तत्काळ तयार करून गृह मंत्रालयाकडे ती पाठवावी. शक्य झालेच तर दोन महिन्यांच्या आत या योजनेची अंमलबजावणी करावी,’ असा सल्ला न्यायालयाने दिला.

सुप्रीम कोर्टानेही अशाच एका प्रकरणात राज्य सरकारांनी पीडित महिलांना भरपाई देण्याच्या दृष्टीने ठोस योजना आखण्याचे निर्देश दिले होते. याबाबत डिसेंबर 2010मध्ये केंद्राने विविध राज्यांना कळवले होते. मात्र, महाराष्ट्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. यावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.