आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अटक बेकायदा, जामीन मिळावा : माजी मंत्री छगन भुजबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनी लाँडरिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात अटक बेकायदा ठरवत जामीन देण्याची विनंती केली. अटक प्रकरणात तपास संस्थेने नियमानुसार कारवाई केली नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. भुजबळ यांच्या हेबियस कॉर्पस याचिकेच्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी भुजबळ यांना चुकीच्या पद्धतीने कोठडीत ठेवल्याचे सांगत जामीन मागितला. हेबियस कॉर्पस याचिकेद्वारे व्यक्ती बेकायदेशीर अटक अथवा ताब्यात घेण्याच्या कारणावरून न्यायालयाचे लक्ष वेधू शकते. अंमलबजावणी संचालनालयाने याचिकेस विरोध केला. भुजबळ ८ महिन्यांपासून कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांनी याचिका याआधी का दाखल केली नाही, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले.

भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात मनी लाँडरिंगविरोधी अधिनियमाच्या (पीएमएलए) घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका मागे घेतली होती. उच्च न्यायालयाने भुजबळ यांची अटकेला आव्हान याचिका फेटाळली होती. त्यामुळे ही याचिका दाखल झाली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी ईडीला बुधवारीही युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. भुजबळांना १४ मार्च रोजी अटक झाली. त्यांनी पीएमएलएच्या कलम १९ व ४५ च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान दिले.
बातम्या आणखी आहेत...