आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arrest Permanently To Dabholkar Says Bapu Maharaj Ravkar

नरेंद्र दाभोलकरांना कायमचे तुरुंगात डांबा : बापू महाराज रावकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सातत्याने वारक-यांच्या भावना दुखावत आहेत.त्यांच्या ट्रस्टमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत. याबाबत वारकरी संघटनेने पुराव्यानिशी सरकारकडे तक्रार केली आहे. अशा वेळी दाभोलकर हे जादूटोणाविरोधी विधेयकासाठी जेलभरो करणार असतील तर शासनाने त्यांना कायमचे तुरुंगात डांबावे, अशी मागणी राष्‍ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष बापू महाराज रावकर यांनी केली आहे.

जादूटोणा विधेयक हिंदूविरोधी असल्याचे सर्वश्रुत झाल्यामुळे मागील 1८ वर्षे हे विधेयक रखडले आहे, तरीही या कायद्याचा आग्रह धरणा-या दाभोलकर यांनी त्यासाठी अनेक खोटे मार्गही अवलंबविल्याचे रावकर म्हणाले.