आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 बँकांचे 2,650 कोटी रुपये लाटणारा झूम डेव्हलपर्सचा प्रवर्तक अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - २५ बँकांकडून २,६५० कोटी रुपयांचे कर्ज लाटत फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आणि प्रवर्तक विजय एम. चौधरीला अटक केली आहे. या कंपनीचा मुंबई आणि इंदुरात व्यवसाय आहे. ईडीचा आरोप आहे की, चौधरीने कथितरीत्या स्वत: आणि सहकाऱ्यांच्या नावावर भरमसाट म्हणजे ४८५ कागदोपत्री कंपन्या उघडलेल्या आहेत. या फसवणूक प्रकरणाचा तो मास्टरमाइंड आहे. हे प्रकरण देशातील बँकांच्या फसवणुकीच्या संबंधित सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. 
बातम्या आणखी आहेत...