आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Chhagan Bhujbal By Chandrakant Shinde, Divya Marathi

मफलर आवडे भुजबळांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल राजकीय नेत्यांची छाप त्यांच्या राहणीमानानेच पडू लागलीय... त्यामुळेच प्रत्येक नेता स्वत:ची अशी एक वेगळी फॅशन स्टाइल निर्माण करू लागलाय... कोणी गुरूशर्ट घालतोय, तर कोणी जॅकेट घालून मिरवतोय... जुन्या गांधी टोप्यांनाही आता सुवर्णकाळ येऊ लागलाय. दिवंगत शिवसेनाप्रमुखही भगव्या कपड्यांमुळे वेगळी ओळख ठेवून होते. एकेकाळचे कट्टर शिवसैनिक व आताचे राष्‍ट्रवादीचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ गेल्या काही वर्षांपासून (अगदी हिवाळा नसतानाही) गळ्यात मफलर घालून फिरताना दिसतात. त्यांची ही वेगळी स्टाइल सध्या खूपच चर्चेत आहे.

राष्‍ट्रवादीचेच नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या स्टाइलची काही काळ कॉपी करून पाहिली. एखाद्या फॅशन डिझायनरच्या सल्ल्यावरून ही ‘मफलर स्टाइल’ सुरू केली काय? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, ‘खरं तर मी गरज म्हणून मफलर वापरण्यास सुरुवात केली होती व तीच आता स्टाइल बनलीय. खांद्याच्या ऑपरेशनसाठी मी परदेशात गेलो होतो. तेथे कडाक्याची थंडी होती. ऑपरेशननंतर काळजी घेण्यासाठी मी मफलर वापरू लागलो. मुंबईत आल्यानंतरही हा नित्यनेम सुरूच होता. घर, गाडी, ऑफिस वातानुकूलित असल्याने मफलरशिवाय राहणे अशक्य होत होते. म्हणूनच मी सगळीकडे मफलर घेऊनच फिरू लागलो. मात्र ही आपली नवी स्टाइल असल्याचा लोकांचा समज झाला आणि मित्र, नातेवाईक व हितचिंतक मला भेटायला आले की मफलर भेट देत असत. काहींनी तर परदेशातूनही मफलर आणून दिल्या. त्यामुळे आता माझ्या विविध डिझाइन्सच्या शेकडो मफलरचा संग्रह झाला आहे आणि हीच माझी स्टाइलच झाली आहे.