आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पकार व प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पकार व प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ... - Divya Marathi
शिल्पकार व प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ...
मुंबई- राष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार व प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ (वय- 68) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी मध्यरात्री बोरिवलीत राहत्या घरी निधन झाले. विठोबा पांचाळ यांच्यामागे पत्नी, मुलगा ऋषिकेश आणि मुलगी रेणुका असा परिवार आहे. मुलगा ऋषिकेश फोटोग्राफर तर मुलगी रेणुका मानसोपचारतज्ज्ञ आहे.
 
पांचाळ यांनी जवळपास 15 वर्षे महाराष्ट्र फाऊंडेशनसारख्या दर्जेदार संस्थेसाठी प्रकाशचित्रणाचे काम केले. पांचाळ यांनी बनवलेल्या कॉम्रेड डांगे यांच्या शिल्पाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीतील संसद भवनात करण्यात आले होते. 4 महिन्यांपूर्वी कोकणातील केशवसुत स्मारक येथे पांचाळ यांनी केशवसुतांच्या तुतारी या कवितेवर आधारित केलेल्या शिल्पाचे अनावरण केले होते. 
बातम्या आणखी आहेत...