आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arts And Music Teacher Payment Issue In Maharashtra, Latest News In Marathi

कला, संगीत शिक्षकांना फक्त ५० रुपये मानधन, शिक्षणमंत्र्यांरोधात तीव्र संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तब्बल २० वर्षांहूनही अधिक काळ पूर्णवेळ कला, संगीत शिक्षकांची भरती न केलेल्या शालेय शिक्षण विभागाने आता शिक्षण हक्क कायद्याच्या दट्ट्यामुळे उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, संगीत, शारीरिक आणि कार्यानुभव विषयाच्या दोन हजारांहून अधिक शिक्षकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही या ‍‍शिक्षकांना वेठबिगारांपेक्षाही कमी म्हणजे प्रतितासिका केवळ ५० रुपये मानधन देण्याचे ‍‍शिक्षण भागाने ठरविले आहे. त्यामुळे पदवीधर कला, संगीत, कार्यानुभव शिक्षकांमध्ये शालेय ‍‍शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहावी ते आठवीच्या कला, संगीत, शारीरिक आणि कार्यानुभव विषयांच्या प्रत्येकी ५ हजार ५०५ प्रमाणे दोन हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्याचे नुकतेच परिपत्रकही काढले आहे.
राज्यात १९९५ पासून सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये कला, संगीत शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही. राज्यात कला, संगीत शिक्षकांसाठी लागणारी पदवी घेणाऱ्या उमेदवारांची संख्या सुमारे ४० हजारांहून अधिक आहे. राज्य सरकारकडून कधीतरी या विषयांचे शिक्षक भरतील या आशेवर हे सर्व उमेदवार होते. मात्र आता ही नियुक्ती तात्पुरती करून प्रतितास केवळ ५० रुपये देण्यात येणार असल्याचे या नव्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ‘राज्याचे ‍‍शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी राज्यातील हजारो कला, संगीत, शारीरिक शिक्षकांवर वेठबिगारीपेक्षांही वाईट वेळ आणली आहे,’ असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
अन् दुसऱ्या हाताने घेतले
तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शालेय ‍‍शिक्षण भागास कला, संगीत ‍‍शिक्षकांची भरती करण्याचे शहाणपण सुचले. पण नवी भरती तासिका तत्त्वावर केल्याने, एका हाताने दिले अन् दुसऱ्या हाताने परत घेतले, अशी चित्र परिस्थिती या ‍‍शिक्षकांवर ओढवली आहे. आता शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.

४० हजार बेकार
कला, संगीत विषयांच्या शिक्षकांची १९९५ पासून राज्यात भरती झालेली नाही. राज्यात सध्या दीडशेच्या आसपास एटीडी पदवी देणारी महाविद्यालये असून सुमारे ४० हजारांहून अधिक एटीडी पदवीधर बेरोजगार असल्याचे कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.