मुंबई - ‘नवभारत घडवत असताना लहान बालके रुग्णालयात दगावण्याची उत्तर प्रदेशातील गाेरखपूरसारखी लाजिरवाणी घटना देशात घडायला नकाे हाेती,’ असे मत व्यक्त करून केंद्रीय अर्थ अाणि संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी भाजपच्या याेगी सरकारला घरचा अाहेर दिला. मुंबई भाजपच्या वतीने रविवारी ‘नवभारताच्या निर्माणाचा संकल्प’ करण्यासाठी विलेपार्ले येथे ‘संकल्प से सिद्धी’ कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला हाेता त्या वेळी ते बाेलत हाेते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि मुंबई भाजप अध्यक्ष अामदार अाशिष शेलार उपस्थित हाेते.
गाेरखपूरमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात गेल्या अाठवड्यात प्राणवायूअभावी ७२ बालकांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही याेगी अादित्यनाथ सरकारला जाब विचारला अाहे. विराेधकांनीदेखील मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथांच्या राजीनाम्याची मागणी केली अाहे. त्यानंतर अाता या घटनेवरून जेटली यांनीही याेगी सरकारवर अप्रत्यक्षपक्षपणे नाराजी व्यक्त केली अाहे.