आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejrival News, Aam Aadmi Party Dont Want To Contest Maharashtra Assembly Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून केजरीवाल आणि कंपनीची माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी तीन महिन्यात महाराष्ट्रात होणा-या विधानसभा निवडणूकीत न उतरण्याचा विचार आम आदमी पक्षात व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढविण्याऐवजी दिल्ली विधानसभेवर लक्ष केंद्रित करावे असे अरविंद केजरीवाल यांना वाटत आहे. याबाबतचा विचार पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 'गुगल हॅंगआऊट'वर नागरिकांशी व पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा विचार मांडला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. एक-दोन उमेदवार सोडले तर सर्व उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. याचबरोबर देशपातळीवर पंजाब सोडले तर सर्वत्र पक्षाची वाताहातच झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे दिल्ली विधानसभा सोडले तर इतरत्र पूर्ण तयारी नसताना लढणे किती संयुक्तिक ठरेल याबाबत आपमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभेला यश मिळवून देईल असा एकही चेहरा आपमध्ये नाही. हरियाणातही योगेंद्र यादव आणि आणखी एक सहकारी यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. तसेच यादव आणि केजरीवाल यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा मध्यंतरी आल्या होत्या. मात्र नंतर त्यावर पडदा पडला होता. हरियाणात लोकसभा निवडणुकीत पक्षाला एक-दोन जागा मिळतील असे बोलले जात होते. मात्र काहीही पदरात पडले नाही. त्यामुळे हरियाणातही येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढण्याचा केजरीवालांचा विचार आहे. याऊलट दिल्लीत एकदा सत्ता मिळाली होती. त्यामुळे तिथेच लक्ष केंद्रित करावे पुन्हा सत्ता हस्तगत करावी असे पक्षातील थिंक टॅंकला वाटते.
पुढे आणखी वाचा, हरियाणा व महाराष्ट्रात निवडणुका न लढण्यामागे कोणती आहेत कारणे?..
(फाईल फोटो)