आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu And Its Followers Claim That There Is No Drought In Maharashtra

आसाराम बापुंच्‍या उलट्या बोंबा, म्‍हणे महाराष्‍ट्रात दुष्‍काळ नाहीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्‍काळी परिस्थितीत हजारो लिटर पाणी वाया घालवून होळी साजरी करणारे आसाराम बापू यांनी स्‍वतःच्‍या कृत्‍याचे समर्थन केले आहे. आपण पाण्‍याची बचत केली असून त्‍यांच्‍या पिचकारीतून निघालेल्‍या रंगीत पाण्‍यामुळे हजारो लोकांचे आजार बरे होतात, असाही दावा त्‍यांनी केला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या होळीने कोणाचेही नुकसान झाले नाही. या वादामागे एका एनजीओचे कारस्‍थान असल्‍याचा आरोपही आसाराम बापुंनी केला आहे.

नाशिक, नागपूर तसेच नवी मुंबईमध्‍ये होळी खेळून हजारो लिटर पाण्‍याची नासाडी केल्‍यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काल नवी मुंबईमध्‍ये प्रसार माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींना मारहाणही झाली. परंतु, हा हल्‍ला माझ्या समर्थकांनी केला नाही, आसाराम बापुंनी सांगितले. उलट महाराष्‍ट्रात दुष्‍काळच नसून या गोष्‍टी धादांत खोट्या आहेत आणि माध्‍यमांनीच या गोष्‍टींना वाढविले आहे, असेही आसाराम बापुंचे समर्थक म्‍हणत आहेत. तर आसाराम बापू म्‍हणतात की प्रत्‍येक माणसावर केवळ अर्धा पेला पाणी वापरण्‍यात आले आहे. त्‍यामुळे पाण्‍याची नासाडी केली नाही.

काल नागपूर महानगर पालिकेने आसाराम बापुंचा कार्यक्रम आयोजित करणा-यांवर कारवाई करुन 9367 रुपयांचा दंड लावला. परतु, आता आसाराम बापुंच्‍या ट्रस्‍टवर कायदेशीर कारवाई करण्‍याचा विचार सुरु आहे. यासंदर्भात विधि‍ज्ञांसोबत चर्चा करण्‍यात येत असल्‍याचे नागपूर महापालिकेचे आयुक्त श्‍याम वर्ध्‍वाने यांनी सांगितले.