आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पाण्याची उधळपट्टी करणार्‍या आसाराम बापूंना अटक न केल्यास आंदोलन'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ऐन दुष्काळात पाण्याची हजारो लीटर पाण्याची उधळपट्टी करणारे आध्यात्मिक गुरु आसाराम बापूंना अटक करण्‍याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. आसाराम बापूंना अटक न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आठवलेंनी दिला आहे.

आसाराम बापूंचा निषेध करण्‍यासाठी नवी मुंबईत आलेल्या आरपीआय कार्यकर्त्यांना त्यांच्या अनुयायांनी मारहाण केली. या मारहाणीत आरपीआयचे तीन कार्यकर्ते भीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रामदास आठवलेंनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पत्रकारांवरील हल्लाचाही निषेध आठवलेंनी यावेळी केला.

दरम्यान, भीषण दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळ असताना आसाराम बापू यांनी मात्र होळीच्या नावाखाली नागपुरात हजारो लिटर पाण्याची नासाडी केल्याची संतापजनक घटना घडली होती.