आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asaram Bapu Satsang Disturbs, Ramdas Athawale Give Signal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापूचे सत्संग उधळून लावू ,रामदास आठवले यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विनयभंगाचा आरोप झटकण्यासाठी आसाराम बापू गौतम बुद्धांचा दाखला देत आहेत. याबद्दल त्यांनी माफी मागावी. अन्यथा, बापूंचे राज्यातील सत्संग उधळून लावू, असा इशारा रिपांइ अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिला.


‘ऋषीमुनींवरील असे आरोप नवे नाहीत. गौतम बुद्धांवरही असे आरोप झाले होते’, असे वक्तव्य नुकतेच बापूंनी केले होते. त्याला आठवले यांनी जोरदार आक्षेप घेत बापूंनी माफी मागावी, अशी मागणी केली. आसाराम हा भोंदूबाबा असून त्यांची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.


रिपाइंचा इशारा गांभीर्याने न घेतल्यास आसारामचा सत्संग होऊ देणार नाही. तसेच त्यांना राज्यात पायही ठेवू देणार नाही, असे आठवले म्हणाले. सोनिया-राहुल कशाला षडयंत्र करतील. बापूच ढोंगी आहेत, असे सांगत आठवलेंनी कॉँग्रेस अध्यक्षांची बाजू उघडपणे उचलून धरली.


बापूंशी रिपाइंचा जुनाच पंगा
यंदा राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. मात्र, आसाराम बापू रंग खेळण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करत होते. नवी मुंबईतील बापूंच्या रंगपंचमीला आक्षेप घेत रिपाइं कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यावेळी रिपाइं कार्यकर्त्यांना बापूंच्या भक्तांनी माराहाण केली होती.