आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आध्यात्मिक संत आसारामबापू जमीन प्रकरणात अडकले आहेत. मध्य प्रदेशात 700 कोटी रुपयांची जमीन हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गंभीर गैरव्यवहार तपास कार्यालयाने (एसएफआयओ)
बापूंविरुद्ध खटला भरण्याची शिफारस केली आहे.
रतलाम येथील 200 एकर जमिनीचे हे प्रकरण असून, आसारामबापू आणि त्यांच्या मुलांविरुद्ध भादंवि आणि कंपनी अॅक्ट 1956 नुसार खटला चालवावा, अशी शिफारस एसएफआयओेने अलीकडेच कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे केली आहे. आसारामबापू, त्यांचे पुत्र नारायण साई आणि इतरांवर खटला चालवण्यासंबंधी यंत्रणेकडून शिफारस आल्याचे मंत्रालयातील एका अधिका-या ने म्हटले आहे. दिल्ली-पुणे फ्राइट कॉरिडोरवर असलेली ही जमीन जयंत व्हिटॅमिन्स लिमिटेडची (जेव्हीएल) आहे. तथापि, 2000 पासून ती हडप करून बापू ती वापरत आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे.
जेव्हीएल एक पब्लिक लिमिटेड कंपनी असून, 2004 मध्ये मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडून तिचे लिस्टिंग रद्दबातल ठरवण्यात आले आहे. ही कंपनी इतर फार्मा कंपन्यांना ग्लुकोज आणि व्हिटॅमिनचा पुरवठा करणारी आघाडीची मानली जाते. जेव्हीएलने या प्रकरणात तक्रार दिली नाही. तथापि, कंपनीच्या एका समभागधारकाने मंत्रालयाशी संपर्क केला. त्यानंतर एसएफआयओला तपास करण्याचे निर्देश देण्यात आले. एसएफआयओने दोन वर्षे तपास केल्यानंतर मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.