आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aseemanand Repeated That His Terrorist Acts Were Sanctioned By The RSS

संघाच्या आदेशानुसारच बॉम्बस्फोट घडविले, असीमानंदची ब्रिटिश मासिकाला मुलाखत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आदेशानुसारच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दर्गा आणि मालेगावमध्ये दोन असे एकूण 5 बॉम्बस्फोट घडविण्यात आल्याचे या बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी असीमानंद याने म्हटले आहे.
कॅरावन (caravan) या ब्रिटिश मासिकाने तब्बल 2-3 वर्षे असीमानंदची 4 वेळा भेट घेऊन त्याला बोलते केले आहे. कॅरावनने आपल्याकडे असीमानंदच्या आवाजातील ऑडिओ टेप्स असल्याचेही म्हटले आहे. कॅरावनने फेब्रुवारी 2014 च्या अंकात याबाबतची सविस्तर मुलाखत प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, असीमानंद याच्या वकिलासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॅरावनने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी कॅरावनने ही मुलाखत प्रसिद्ध केली असल्याने ते खरेच असले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असीमानंद याने केलेला हा खुलासा संघ आणि भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
2006 ते 2008 या दोन वर्षाच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमध्ये दोन असे एकूण 5 बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांत सुमारे 120 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 80 लोक जखमी झाले होते. या स्फोटांमागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसने केला होता. त्यानुसारच स्वामी असिमानंदसह काही जणांना अटक करण्यात आली होती. असीमानंद सध्या अंबाला येथील तुरुंगात आहे. येथेच कॅरावन मासिकाच्या प्रतिनिधीने असीमानंदची मुलाखत घेतली आहे. त्यासाठी या प्रतिनिधीने दोन वर्षे सतत असीमानंदच्या संपर्कात राहून विश्वास संपादन केला व त्याच्याकडून सत्य काढून घेतले आहे.
मुलाखतीत काय खुलासा केला असीमानंदने वाचा पुढे...
असीमानंद यांचे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेले हे वक्तव्य राजकारणाने प्रेरीत असेल...की त्यांनी केलेला खुलासा सत्य असेल... आपल्याला काय वाटते... आपली प्रतिक्रिया व्यक्त करा....आमच्या फेसबुक पेजला भेट द्या...