आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ विचारवंत असगर अली इंजिनियर यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ लेखक तसेच सुधारणावादी मुस्लिम विचारवंत असगर अली इंजिनियर यांचे मंगळवारी प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. असगर अली मागील काही महिन्यांपासून आजारी होते. अखेर मंळवारी सकाळी आठ वाजता सांताक्रूझमधल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत. असगर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा इरफान आणि मुलगी सीमा इंदूरवाला असा परिवार आहेत.

दाऊदी बोहरा या चळवळीचे प्रवर्तक म्हणूनही असगर अलीची ओळख होती. तसेच भारत आणि दक्षिण आशियातल्या जातीय पक्षपाताविरोधात त्यांनी महान कार्य केले होते.