आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जिकल स्ट्राइक करायला ५६ इंचांची छाती लागते; शेलारांचा ठाकरेंना टाेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाठीत वार करणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याचा इशारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा भाजपचे मुंबई शहराध्यक्ष, अामदार अाशिष शेलार यांनी समाचार घेतला. ‘सर्जिकल स्ट्राइक करायला ५६ इंचांची छाती लागते. ती धमक फक्त पंतप्रधान नरेंद्र माेदींमध्येच अाहे. इतर काेणीही हे धाडस करू शकत नाही. त्यामुळे इतरांनी (शिवसेनेने) त्याबाबत काहीच बाेलू नये,’ असा टाेला त्यांनी ठाकरेंना लगावला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाेलताना उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपचा समाचार घेतला हाेता. मुंबईसह राज्यातील अागामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचेही संकेत दिले. त्यावर शेलार म्हणाले, ‘मुंबई महापालिकेतील माफियाराज संपवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार अाहे. अाता त्यांनीच (शिवसेनेने) ही सुरुवात केली असून त्याचा शेवट मात्र अाम्ही करणार अाहाेत. शिवसेनेने दिलेल्या अाव्हानाला त्यांना समजेल अशाच भाषेत अाम्ही प्रत्त्युत्तर देऊ,’ असा इशाराही शेलार यांनी दिला अाहे.
तर शिवसेनेने सीमोल्लंघन अाधीच केले असते : विखे
‘शिवसेनेचा स्वाभिमान संपुष्टात आला आहे. स्वाभिमान शिल्लक असता तर शिवसेनेने सरकारमधून सीमोल्लंघन करून खऱ्या अर्थाने दसरा साजरा केला असता. शिवसेनेची शस्त्रे गंजली आहेत. त्यांची धार गेली आहे. ती आता कुचकामी ठरली आहेत. शिवसेनेच्या कृतीला नव्हे, तर केवळ तोंडाला धार उरल्याचे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणातून स्पष्ट झाले अाहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बाेलत हाेते.

अामने- सामनेची हिंमत नाही : विखे
‘पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचार करू नये, अशी मागणी करून ठाकरेंनी मोदी किंवा फडणवीसांना तोंड देण्याची शिवसेनेची क्षमता नाही,’ अशी जाहीर कबुलीच दिली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आमने- सामने सुनावण्याची ठाकरेंची हिंमत नाही. त्यामुळे मेळाव्याचे औचित्य साधून ते पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना सुनावण्याची हौस भागवून घेत आहेत,’ असा टाेलाही विखेंनी लगावला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मराठा अारक्षणाबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी कवडीचीही किंमत दिली नाही, याकडेही विखेंनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...