आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्याकडून प्रतिक्रिया आली तर सहन करण्याची तयारी ठेवा- शेलार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना अटक करण्याची मागणी करत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना-भाजपच्या वादात नव्याने तेल ओतले आहे. शिवसेनेचे मुखपत्र जाळण्याची भाषा करून शेलार हे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही गोऱ्हे यांनी केला आहे. भाजपच्या नेत्यांचे पुतळे जाळून आंदोलने करणाऱ्यांनी त्यावर उमटू शकणाऱ्या प्रतिक्रिया सहन करण्याचीही तयारी ठेवावी, या शेलारांच्या वक्तव्यावर त्या बोलत होत्या.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला ‘निझामाचे बाप’ असे संबाेधल्यानंतर त्याला उत्तर म्हणून भाजपचे मुखपत्र असलेल्या “मनोगत’ या नियतकालिकात प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘असरानी’ संबोधले होते. भंडारींच्या या लेखानंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भंडारींचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला होता. रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात आशिष शेलार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी पुन्हा एकदा या वादाला हवा दिली. ‘लोकशाहीत सर्वांनाच आंदोलन करण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार असतो. मात्र, तशाच पद्धतीची प्रतिक्रिया आमच्या कार्यकर्त्यांकडून उमटली तर त्यांनीही सहन करण्याची तयारी ठेवावी,’ असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिला. त्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या सहकार्याने शेलार यांनी अनेक पदे उपभोगली. मात्र, त्याची कोणतीही जाणीव ठेवता शेलार सातत्याने फडतूस विधाने करत असल्याचे त्या म्हणाल्या. सत्ताधारी पक्षाचे आमदारच जर अशी बेछूट विधाने करून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणत असतील तर शेलारांना अटक करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली अाहे.

पालिका निवडणुकीतही रंगणार “चाय पे चर्चा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात’ हा कार्यक्रम यापुढे जेव्हा होईल तेव्हा मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ वॉर्डांमध्ये त्यांच्या सामुदायिक श्रवणाचे आयोजन करण्याची घोषणा मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. “मन की बात, चाय के साथ’ असे या उपक्रमाचे नाव असून या उपक्रमाच्या माध्यमातून आता भाजपने महापालिकेच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही ‘चाय’चीच चर्चा असेल याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, राष्ट्रवादीने काय दिला सल्ला...
बातम्या आणखी आहेत...