आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही मुंबईच्या महापौरांनी दिली फुटबॉल खेळाडूंना मेजवानी; शेलारांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या फुटबॉल खेळाडूंसाठी त्यादिवशी मेजवानी ठेवण्यात आली होती. - Divya Marathi
मुंबईच्या महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या फुटबॉल खेळाडूंसाठी त्यादिवशी मेजवानी ठेवण्यात आली होती.
मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राजकीय नेते वेगवेगळे सेलिब्रेशन करण्यात मग्न असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी महापौर बंगल्यावर त्याच दिवशी झालेल्या पार्टीवर जोरदार टीका केली आहे. 
 
महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या फुटबॉल खेळाडूंसाठी त्यादिवशी मेजवानी ठेवण्यात आली होती. संपूर्ण राज्य या घटनेने दुख:त असताना आता या घटनेवर राजकारणही चांगलंच रंगू लागले आहे. आशिष शेलार म्हणाले की, “प्रत्येक राजकीय पक्षातील संवेदनशील नेत्यांनी अशाप्रकारच्या घटनेनंतर आपली संवेदना दाखवलीच पाहिजे. गरबा खेळणाऱ्या नेत्यांनी आपली संवेदना जागृत ठेवून गरबा खेळावा. आणि परदेशी फुटबॉल खेळाडूंना महापौर बंगल्यात मेजवानी देताना ही संवेदना दाखवलीच पाहिजे.” 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...