आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी; अशोक चव्हाण याची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नांदेड- ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. मात्र उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहेत.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
‘परिवहन खाते हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका चालणार नाही.’ असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले. मागील 3 वर्षांपासून एसटी तोट्यात आहे आणि हे सरकारचे उत्तरदायित्व आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. तर या संपामुळे दुसरीकडे सामान्य लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ यावर तोडगा काढावा. अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...