आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan Urges High Court To Recall Order In Adarsh Case

आदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांची निर्दोष मुक्तता होणार? शुक्रवारी येणार मोठा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याप्रकरणी ठेवलेले आरोप मागे घेण्याची विनंती सीबीआयने मुंबई हायकोर्टाला दिल्यानंतर नकार देणा-या न्यायमूर्तींनी अखेर आता तयारी दाखवली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून राजकीय वनवासात असलेल्या अशोक चव्हाणांना दिलासा मिळताना त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होऊ शकते. पाच वर्षापूर्वी 2010 मध्ये अशोक चव्हाण यांचे नाव आदर्श घोटाळ्याशी जोडल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
आदर्श घोटाळ्यात आपल्याला राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून गोवण्यात आले आहे. आपल्याविरोधात कोणतेही पुरावे सरकारी यंत्रणांना सापडले नाहीत. एखाद्या व्यक्तीविरुद्ध पुरावा नसेल तर त्या व्यक्तीची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याची फौजदारी दंड प्रक्रियेच्या 169 या कलमात स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे सीबीआयच्या म्हणण्यानुसार या घोटाळ्यातील आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळावे या मागणीसाठी अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई हायकोर्टाची पायरी चढली व आरोपींच्या यादीतून वगळावे अशी विनंतीही चव्हाण यांनी आपल्या अर्जात केली. त्यावेळी मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनी चव्हाणांच्या अर्जाची सुनावणी करीत गरज भासल्यास आपण आपले आदेश मागे घेऊ असे सांगितले. त्यामुळे अशोक चव्हाण यांना त्यावेळी सुखद धक्का मिळाला. मात्र याप्रकरणी कोणताही निकाल न देता त्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 23 जानेवारीपर्यंत तहकूब केली.
दरम्यान, सीबीआयचा अर्ज फेटाळून लावणारा स्वत:चाच आदेश मागे घेण्यास मुंबई हायकोर्टाने तयारी दर्शिवल्याने चव्हाण यांच्या निर्दोष सुटकेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. अशोक चव्हाण मागील 5 वर्षे राजकीय विजनवासात आहेत. 2010 मध्ये आदर्शमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर पक्षाने त्यांच्याकडून तडकाफडकी मुख्यमंत्रीपद काढून घेतले होते. आदर्श प्रकरण देशभर गाजले व त्यामुळे काँग्रेस पक्षाबरोबरच अशोक चव्हाणांची पुरती नाचक्की झाली. त्याचा फटका त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकांत झाला व काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र, आता या प्रकरणातून चव्हाण यांची निर्दोष सुटका झाली तर चव्हाण यांच्याबरोबरच काँग्रेसलाही राज्यात फायद्याची ठरणार आहे.
निर्दोष मुक्तता झाल्यास लगेच बक्षिसी- अशोक चव्हाण यांची आदर्श घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यास काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष लागलीच सोपविण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीत काँग्रेस रसातळाला गेला आहे. अशा स्थितीत तरूण व संघटनात्मक पातळीवर प्रभावी ठरू शकतील अशा अशोक चव्हाणांकडे नेतृत्त्व दिल्यास पक्षाला राज्यात उभारी मिळू शकते. याच जमेच्या बाजूमुळे चव्हाणांवर नवी जबाबदारी सोपविली जाऊ शकती. लोकसभा निवडणुकीवेळी अशोक चव्हाण यांनी आपली जागा जिंकून देत काँग्रेसची लाज राखली होती. तसेच त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली हिंगोलीची जागा ( राजीव सातव) मिळविण्यात यश आले होते.
पुढे वाचा, अशोक चव्हाणांनी नेटाने लढली कायद्याची लढाई...