आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan Vs CM, Congress Unsuccessful News In Marathi

चव्हाण Vs चव्हाण; कुचकामी नेतृत्त्वामुळेच कॉंग्रेसचा पराभव; अशोक चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला सामावून घेण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाला अप्रत्यक्ष आव्हानच दिले. लोकसभेतील विजयानंतर सक्रिय झालेल्या अशोकरावांनी जेथे नेतृत्व कुचकामी होते, तेथे पराभव झाला, या आपल्या मताचाही पुनरुच्चार केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिंतन बैठकीत गुरुवारी अशोकरावांनी सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि पक्ष संघटनास्तरावर प्रदेशाध्यक्ष अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका सुरू आहेत. त्यात नांदेड व हिंगोलीतील राजीव सातव यांच्या विजयाचे खुद्द अशोकरावांनीच विश्लेषण केले. येथे निवडणूक काळात कशी कामे झाली. मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी एमआयएमची उमेदवारी रोखली. विरोधकांना गाफील ठेवल्याने निवडणुका जिंकल्या, असे सांगतानाच राज्यात इतरत्र काय चुका झाल्या याचे दाखलेही अशोक चव्हाण यांनी या वेळी दिले.

सक्रीय होणार?
० लोकसभेतील पराभवाने कमकुवत झालेले केंद्रीय नेतृत्व व राज्यात बॅकफूटवर गेलेले मुख्यमंत्री अशात अशोकरावांना विजयाने उभारी दिली.
० आदर्श प्रकरणामुळे काही काळ विजनवासात गेलेले अशोकराव नव्या उमेदीने उतरल्याचे पाहून समर्थकही सक्रिय झाले. निर्णय प्रक्रियेत त्यांच्या समावेशाची मागणी झाली.

राणे समर्थकांचा बहिष्कार
काँग्रेसचे दुसरे नेते नारायण राणे चिंतन बैठकीला हजर नव्हते. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीचे पदाधिकारीही नव्हते. या कमिटीने राणे यांना मुख्यमंत्री करण्याचा ठरावही घेतला आहे. त्यावर मुख्यमंत्री कोणाला करायचे हा निर्णय जिल्हा कमिटीचा नव्हे, हायकमांडचा असतो, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पराभवाचे खापर...
केंद्राची धोरणे, नेत्यांचे इंग्रजीत बोलणे भोवले

केंद्र सरकारची धोरणे, इंधनाची दरवाढ, गॅस महाग करणे व काँग्रेसच्या नेत्यांची इंग्रजीतून भाषणे भोवली, अशा शब्दांत राष्ट्रवादीने काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेसवर पराभवाचे खापर फोडले. भाजपचे नेत्यांची हिंदीतील भाषणे लोकांना भावत होती. याउलट सोनिया गांधी, मनमोहनसिंग, चिदंबरम हे इंग्रजीतून बोलत होते. आमचा हा ब्लेमगेम नाही, की राजीनामेही मागत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष शरद पवार शुक्रवारी आमदार, उमेदवारांची बैठक घेणार आहेत.

विलीनीकरण नाही : राष्ट्रवादी व तृणमूलने काँगे्रसमध्ये विलीन व्हावे या काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्या वक्तव्यावर मलिक म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विलीन होणार नाही.