आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या मंत्र्यांमध्ये सत्तेचा उन्माद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या मंत्र्यांमध्ये सत्तेच्या उन्माद दिसून येत आहे. त्यामुळेच या मंत्र्यांनी नैतिकता खुंटीला टांगून ठेवल्याचे दिसते. या परिस्थितीत केंद्र व राज्यातील या पक्षाची सरकारे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची शक्यता नाही, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी वर्तवले.

युवक काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदरसिंग ब्रार, महाराष्ट्राचे सहप्रभारी श्योराज जीवन वाल्मीकी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी सोनिया गांधींबाबत केलेल्या विधानातून त्यांची वैचारिक दिवाळखोरी व मानसिक विकृत्ती दिसून येते. त्यातून वर्णभेद आणि महिलांप्रती अनादर अधोरेखित होतो. मुळात भाजपची भूमिका महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान देणारीच राहिली आहे. अशा वक्तव्यामुळे भारतीय संस्कृतीचे स्वयंघोषित ठेकेदार होऊ पाहणाऱ्या भाजपचा मुखवटा गळून पडला आहे’, असे चव्हाण म्हणाले.