आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉक्सकॉन गुंतवणूक खरेच होईल का? : अशोक चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फॉक्सकॉन कंपनीने गुंतवणुकीबाबत केलेल्या सामंजस्य कराराबद्दल राज्य सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी ही गुंतवणूक खरोखरच केली जाईल का, याबद्दल काँग्रेसने साशंकता व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना हजारो कोटींचे सामंजस्य करार झाले. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी ८ टक्केच गुंतवणूक करण्यात आली, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. मुख्यमंत्र्यांच्या सहकुटुंब विदेश दौऱ्यांचा राज्याला खरोखरच लाभ होवो, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्यासोबत सामंजस्य करार केल्याचे जाहीर केले. सदर करारान्वये फॉक्सकॉन येत्या ५ वर्षांमध्ये राज्यात ५ बिलियन डॉलर म्हणजे ५०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. सदर गुंतवणुकीचा आकडा हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी वाढवून सांगितलेला नसावा आणि खरोखरच एवढ्या प्रमाणात ही गुंतवणूक व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.