आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षात सरस्वतीने पाठीवर हात ठेवला; अशोक पत्की यांची भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गायकी क्षेत्रातील सर्वात उच्च असा लता मंगेशकर पुरस्कार मिळणे म्हणजेच साक्षात सरस्वतीने पाठीवर हात ठेवल्याप्रमाणेच आहे. काम सच्चाईने केले तर फळ मिळतेच. त्यामुळे आज माझे जीवन सफल झाले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना शनिवारी दिली. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. 5 लाख रुपये रोख, शाल, र्शीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या कार्यक्रमात यशवंत देव, आनंदजी, रवींद्र जैन, सुलोचना चव्हाण उपस्थित होते. ‘जिसे लालसा ना किसी पदकी वह अशोक पत्की’ अशा शब्दांत रवींद्र जैन यांनी त्यांचे कौतुक केले.

सुमनताईंचे आभार
वादक म्हणून सुरुवातीला चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. पुढे 64 मध्ये पं. जितेंद्र अभिषेकी यांना 20 वर्षे सहायकाचे काम केले. त्यांच्याकडून शब्दफेक कशी असावी, पॉझ म्हणजे काय या सर्व बारीकसारीक गोष्टी शिकता आल्या. त्यानंतर गायिका सुमन कल्याणपूर यांना एका पेटीवाल्याची गरज म्हणून तिथे पेटी वाजवणारा म्हणून रुजू झालो. मी संगीताचे नोटेशन्स तयार करू शकतो असा सल्ला आणि भान सुमनताईंनी दिले. त्यातून पहिले गाणे ‘एकदाच यावे सखया’ हे तयार केले आणि नंतर केतकीच्या बनी, नाविका रे अशा गाण्यांनी मला संगीतकाराच्या खुर्चीवर बसण्याची संधी दिली. अशोक पत्की, संगीतकार