आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकोचे संचालक अशोक पेंढरकर यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विको लेबॉरेटरीजचे संचालक अशोक पेंढरकर यांचे गुरुवारी अल्पश: आजाराने मुंबईत निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते. मुंबईतील भोईवाडा स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. "विको लेबॉरेटरीज'चा डोंबिवली येथील कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून अशोक पेंढरकर सांभाळत होते. हसतमुख चेहरा आणि आपल्या स्वभावामुळे ते कंपनी व मित्रपरिवारात अतिशय प्रिय होते. पेंढरकर यांच्या पश्चात पत्नी मधुमिता, पुत्र अमित, कन्या रश्मी सहस्रभोजनी, जावई अंशुमान सहस्रभोजनी, सून ऋता आणि नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, पेंढरकर यांच्या निधानाबद्दल राजकीय नेते आणि उद्योग जगतातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.