आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण; अभय कुरुंदकर यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली आहे. पनवेल  ठाण्यातून अभय कुरुंदकरांना ताब्यात घेत अटक केली. 

 

 

गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत. अश्विनी बिद्रे यांचे वडिल जयकुमार बिद्रे यांनी हायकार्टात आदेश देऊनही तपास करण्यात पोलिस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार केली होती. अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत अभय कुरुंदकर यांना अटक केली आहे. 

 

आळते (जि.कोल्हापूर) येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे यांचा विवाह 2005 साली हातकणंगलेतील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर अश्विनी पोलिस उपनिरीक्षक झाल्या. पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली येथे झाली. त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. काही कालावधीनंतर कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. या काळातच २०१५ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. त्या हजर झाल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप करीत, कुरुंदकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती


 

बातम्या आणखी आहेत...