आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या केवळ वल्गनाच, कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे. रामाणे यांनी भाजपच्या उमेदवार सविता भालकर यांचा 11 मतांनी पराभव केला. रामाणे यांना 44 तर भालकर यांना 33 मते मिळाली. त्याअगोदर ताराराणीच्या उमेदवार स्मिता माने यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. मात्र, आघाडीतील नगरसेवक फोडून महापौरपद मिळवू अशी दर्पोक्ती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती मात्र ती केवळ वल्गनाच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे शमा मुल्ला यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने तटस्थ राहत आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली.
मागील पंधरवड्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत कोल्हापूरात काँग्रेस आणि भाजप- ताराराणी युतीत जोरदार रस्सीखेच झाली मात्र अखेर सतेज पाटील यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले होते. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ महाडिक कुटुंबियांच्या ताराराणी संघटनेने 20 जागा मिळवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 15 जागा जिंकल्या आहेत. भाजपचे 12 जागावर उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला केवळ 4 जागा मिळाल्या. मात्र, भाजपचे मंत्री व पालकमंत्री यांनी कोल्हापूरात भाजप-ताराराणीचाच महापौर होईल असे सांगितले होते. माजी मंत्री व कोल्हापूरातील काँग्रेसचे प्रस्थ सतेज पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला महापौरपद देऊन सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, हसन मुश्रीफ यांनी ते साफ झिडकारले.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही आमदार महाडिक यांच्यापासून दूर राहण्यातच हित असल्याचे वेळीच ओळखले. अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आजच्या महापौर निवडीनंतर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसकडे महापौरपद तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद देण्यात येणार आहे. तर स्थायी समितीचे अध्यक्षपद आटलून-पाटलून दिले जाईल.