आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: वरिष्ठावर गोळी झाडून एएसआयने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जोशी तसेच त्यांच्या ऑर्डर्लीवर गोळी झाडून सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिर्के यांनी आत्महत्या केली. ही घटना वाकोला पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. जोशी व त्यांचा आॅर्डर्ली यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

शिर्के सकाळी ड्यूटीवर हजर झाले नाहीत. संध्याकाळी ठाण्यात येऊन त्यांनी जोशींशी वाद घातला. जोशी बाहेर पडत असतानाच शिर्केंनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या, तर ऑर्डर्लीवर एक गोळी झाडली. नंतर लगेच स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. जोशी आणि ऑर्डर्लीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हे शाखा या घटनेचा तपास करत आहे.