आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन संस्कृतीविषयी ‘एशियाटिक’चा अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दोन शतकांची परंपरा असलेल्या मुंबईतील एशियाटिक सोसायटीने प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला आहे. तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी 12 वी उत्तीर्णची अट आहे.

प्राचीन भारताची लिखित आणि मौखिक साधने, नाणकशास्त्र, शिलालेखशास्त्र, लिपीशास्त्र, उत्खननशास्त्र, इतिहासलेखनशास्त्र, मूर्तिशास्त्र, स्थापत्यशास्त्र या प्राच्यविद्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच्या अखेरीस 150 गुणांची लेखी, तर 50 गुणांची तोंडी परीक्षा ठेवण्यात आली आहे. अभ्यासक्रम उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 40 गुण मिळवावे लागतील. प्रत्येक शनिवारी या अभ्यासक्रमाची व्याख्याने फोर्ट परिसरातील एशियाटिक सोसायटीच्या गं्रथालयात होतील. ऑगस्ट महिन्यात सदर अभ्यासक्रम चालू होईल.
तर मे महिन्यात परीक्षा होतील. अभ्यासक्रमाचे शुल्क 3500 रुपये आहे. एशियाटिक सोसायटीमधील महामहोपाध्याय डॉ. पा. वा. काणे पदव्युत्तर-पदवी अभ्यास आणि संशोधन केंद्र या अभ्यासक्रमाचे संयोजन करत आहे.

मुंबईतील नामवंत पुरातत्त्वशास्त्रज्ञ तसेच इतिहासाचे प्राध्यापक या अभ्यासक्रमात शिकवणार आहेत. प्राचीन भारतीय ज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म आणि जीवनशैलीचे आधुनिक पद्धतीने आकलन होण्यासाठी या अभ्यासक्रमाचा चांगला उपयोग होईल, अशी आशा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.