आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयने घेतले निम्मेच मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘हाऊसफुल-2’, ‘रावडी राठौर’ आणि ‘ओ माय गॉड’ असे गेल्या वर्षात तीन हिट चित्रपट देणा-या अक्षय कुमारने ‘स्पेशल छब्बीस’ चित्रपटासाठी केवळ अर्धे मानधन घेतले आहे.

एका मुलाखतीत अक्षय म्हणाला, ‘स्पेशल छब्बीस’च्या यशाबाबत मी काळजी करत नाही. माझ्यावर कोणतेही दडपण नाही. या चित्रपटाचे बजेट अतिशय कमी होते. मात्र, दर्जेदार कथा असल्यामुळे हा चित्रपट स्वीकारून मी केवळ अर्धेच मानधन स्वीकारले. निर्मात्याचे बजेट कमी असल्याने याचा परिणाम हा चित्रपटावर होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी हा निर्णय घेतला. ‘छब्बीस’ची कथा ही स्पेशल असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल .
1986 मध्ये अॉपेरा हाऊस येथील त्रिभुवनदास भीमजी झव्हेरी यांच्या दुकानावर पडलेल्या दरोड्याच्या सत्यकथेवर हा चित्रपट बेतला आहे. यात अक्षयने बनावट सीबीआय अधिकाºयाची भूमिका साकारली आहे. सराफाच्या दुकानावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे सोने लुटण्यात येते. यानंतर दुकानातील पेट्यातील सोने बाहेर काढून काही जणांना सोडून अक्षय आणि त्याचे साथीदार पसार होतात अशी या चित्रपटाची कथा आहे. अक्षयसोबत काजल अग्रवाल, जेमी शेरगील, मनोज वाजपेयी अनुपम खेर यांच्या भूमिका आहेत.

काजल सुंदर, दर्जेदार!
‘सिंघम’ चित्रपटात अजय देवगणसोबत दिसलेली काजल अग्रवाल ‘स्पेशल छब्बीस’मध्ये आहे. ती सुंदर व दर्जेदार अभिनेत्री आहे. तिला कायम नवे शिकण्याची इच्छा असते. एकूणच तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा असल्याचे अक्षयने सांगितले.