आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा रोखण्याचा प्रयत्न उधळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पायऱ्यांवर अांदाेलन करणाऱ्या विराेधकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करणारे महसूलमंत्री खडसे. - Divya Marathi
पायऱ्यांवर अांदाेलन करणाऱ्या विराेधकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करणारे महसूलमंत्री खडसे.
मुंबई- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची तयारी दाखवल्यानंतरही विरोधकांनी गोंधळ घालत मंगळवारी विधानसभेतून सभात्याग केला. मात्र, त्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी दिवसाच्या कार्यक्रमपत्रिकेतील कामकाज आटोपल्याने विरोधकांवर चरफडत बसण्याची पाळी आली.
"प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हवा तितका वेळ चर्चा करू. तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची शासनाची तयारी आहे. सभेचे कामकाज चालू द्यावे,’ अशी विनंती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. मात्र, विरोधक मागणीवर ठाम होते. गोंधळ थांबत नसल्याचे पाहून अध्यक्षांनी कामकाज तसेच चालू ठेवले. याचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.
यानंतर सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री विधानसभेत आले. त्यांच्या उपस्थितीत पुढे अडीच तास काम कामकाज सुरू राहिले. दरम्यानच्या काळात, प्रभारी सांसदीय कामकाजमंत्री प्रकाश मेहता यांनी व्हरंड्यात बसून राहिलेल्या विरोधकांची भेट घेत त्यांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची विनंती केली. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यापुढे आम्ही भूमिका स्पष्ट करू, असे विरोधकांनी सांगितले. त्यानुसार बागडे यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली; परंतु त्यातून तोडगा निघाला नाही.
मोदींचा निषेध
सकाळी कामकाज सुरू होताच 'काँग्रेस-राष्ट्रवादी'च्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत गर्दी केली. अनेकांनी फाडलेल्या कागदांचे तुकडे हवेत भिरकवण्याचा कार्यक्रम सुरू केला. अध्यक्षांनी विनंती करूनही हा प्रकार थांबला नाही. २० मिनिटांच्या गोंधळात विरोधकांनी मोदी यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.
"भाजप-शिवसेने'ची कुरघोडी
चर्चा करण्याचा मार्ग सोडून ‘काँग्रेस-राष्ट्रवादी'ने गोंधळाचा रस्ता धरला. दुसरीकडे ‘भाजप-शिवसेने'च्या आमदारांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचा प्रस्ताव दाखल करून विरोधकांवर तांत्रिकदृष्ट्या मात केली. अनिल गोटे यांनी या प्रस्तावावर भाषण करून चर्चेचा प्रारंभही केला. त्यानंतर कामकाज तहकूब झाले.
जेष्ठ्यांचा संयम : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, "राष्ट्रवादी'चे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे हे गोंधळ पाहत जागी शांत बसून होते.