आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assets Worth Rs200 Crore. Leena Arjun Garad Is The Wife Of An Police Inspector At Navi Mumbai

असा ही महाराष्ट्र: खारघर ग्रामपंचायत उमेदवाराकडे 200 कोटींची \'माया\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 200 कोटी रूपयांची मालकिन उभी राहू शकते का असा प्रश्न विचारला तर कोणीही नाही म्हणेल व उत्तर देईल की, ती गावपातळीवरच्या राजकारणात कशाला थेट लोकसभा-विधानसभेच्या फडात उतरेल ना. पण हो खरोखरच 200 कोटी रूपयांची मालकिन लीना गराड मुंबईजवळील खारघर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. रविवारी खारघर येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खारघर कॉलनी फोरमतर्फे वॉर्ड 3 मधून उभ्या होत्या. आज त्या निवडणुकीचा निकालही लागला. लीना गराड यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. पण इथल्या बड्या नेत्यांच्याही त्यांच्या संपत्तीवरून भुवया उंचावल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी की, लीना गराड या सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन गराड यांची पत्नी. या गराडसाहेबांना तीस हजाराच्या आसपास पगार आहे. असे असताना या लीना गराड यांच्याकडे 200 कोटींची माया आली कोठून असा सवाल तमाम भल्या लोकांना पडला आहे. यावर लीना गराड म्हणतात, या परिसरात आमच्याकडे मोठी जमीन आहे. या भागात जमिनीची किंमत गेल्या काही दिवसात प्रंचड वाढ झाली आहे. त्यामुळे आमच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर आमच्याकडे भूखंड आहेत. कारण मी गेली 13 वर्षे बांधकाम व्यावसायात आहे आणि आमचे सर्व व्यवहार कायदेशीर व कागदावर आहेत. याबाबत आम्ही सरकारला इनकम टॅक्सही भरतो तसेच परतावे देखील दाखल करतो.
पुढे वाचा, स्थानिक आमदार जयंत पाटील यांनी काय केले आरोप आणि लीना यांनी काय दिले उत्तर...