आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assocham News In Marathi, Business, Divya Marathi

असोचेम देणार महिला संचालकांना प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संचालक मंडळावर महिलांची नियुक्ती करताना आवश्यक असलेल्या नियमांच्या पूर्तता करणे कंपन्यांना शक्य व्हावे यासाठी ‘असोचेम’ने पुढाकार घेतला आहे. कंपनी प्रशासनाची विविध अंगे समजावीत यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिक भक्कम करण्याची योजना आखली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये तीन हजार महिलांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी अपेक्षा असोचेमने व्यक्त केली आहे.


शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे भरणा झालेले भागभांडवल किंवा 300 कोटी वा त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या प्रत्येक नोंदणीकृत कंपनीला तसेच प्रत्येक सार्वजनिक कंपनीला किमान एक तरी महिला संचालकाची नियुक्ती करणे कंपनी कायदा 2013 नुसार बंधनकारक आहे.


कंपनी कायद्यातील या तरतुदीमुळे एका ठरावीक कालावधीत संचालक मंडळामध्ये समावेश करण्यासाठी स्वतंत्र संचालक आणि महिला संचालकाचा शोध सुरू करणे कंपन्यांसाठी महत्त्वाचे आहे. महिला या कालावधीचा उपयोग करून संचालकपदाची नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी स्वत:ला त्याबाबत प्रशिक्षित करून घेऊ शकतात, असे मत असोचेमच्या कंपनी व्यवहार राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्ष प्रीती मल्होत्रा यांनी सांगितले.


नवीन गरजा आणि सध्या उपलब्ध असलेल्या स्वतंत्र संचालकांची संख्या यातील दरी बघता संचालक होण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असलेल्या महिला संचालकांची मोठय़ा प्रमाणावर माहिती असोचेमने संकलित केली आहे.मसुद्यातील नियमावलीनुसार प्रत्येक नोंदणीकृत कंपनीला हा नियम प्रत्यक्षात येण्याच्या कालावधीपासून वर्षभराच्या आत महिला संचालकांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त आहे.