आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळवीरांच्या जेवणाचे तंत्रज्ञान भारतात, १५ सेकंदांत वांग्याचे भरीत तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंतराळात अंतराळवीरांना ज्याप्रमाणे इन्स्टंट खाद्यपदार्थ दिले जाते. त्याच धर्तीवर सचिन गोडबोले आणि संदीप भालेराव या चुलत बंधूंनी अ‍ॅस्ट्रॉनॉट फूडची योजना आखली आहे. फ्रिज ड्रायिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यंजनांची पावडर तयार करून ती विकली जात आहे. संदीप भालेराव हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सनविलेमध्ये राहतात. नासापासून हे गाव फक्त पाच किमीवर आहे. एमबीए असलेले भालेराव यांनी "दिव्य मराठी'ला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, चीन, हाँगकाँग आदी देशांमध्ये जाणा-या शाकाहारी भारतीयांना जेवणाची अडचण येतेे. त्यांना शाकाहारी भोजन मिळावे यासाठी अ‍ॅस्ट्रॉनॉट फूडची सुरुवात केली आहे. त्यांच्या कोल्हापुरच्या फॅक्टरीत दिवसाला १५० किलो जेवण शिजवले जाते. फ्रिज ड्रायिंगने ते ४५ किलो होते. नंतर त्याचा पुरवठा केला जातो.

काय आहे पद्धत ?
१९६० मध्ये नासाने अंतराळवीरांच्या जेवणाची समस्या सोडवण्यासाठी फ्रिज ड्राियंग पद्धत शोधून काढली. यामध्ये जेवण तयार करून ते उणे ४५ डिग्रीमध्ये ठेवून त्यातील पाणी शोषून घेतले जाते. पाणी शोषल्याने नाशवंत पदार्थाची पावडर तयार होते. ही पावडर अनेक महिने-वर्षे टिकते. या पावडरमध्ये गरम पाणी टाकल्यास १५ मिनिटांत पुन्हा पूर्वीसारखे व्यंजन तयार होते. सध्या सैन्यदलांसाठी या तंत्रज्ञानामार्फत जेवण उपलब्ध करून दिले जाते. भारतीय सैन्यही याच प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घेतात.

दोन वर्षांत औरंगाबादेत
अ‍ॅस्ट्रॉनॉट फूडचे १५० आऊटलेट्स २०१६ पर्यंत मुंबई, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा अशा वििवध िठकाणी सुरू करण्यात येणार असून मुंबईतील टर्मिनल टी-२ सह सिंगापूर, चीन आणि अमेरिकेतील नेवाडा विमानतळावरही जागा घेऊन तेथेही अ‍ॅस्ट्रॉनॉट फूडचे स्टॉल सुरू करण्यात आलेले आहेत.