आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At Least 2 Victims Of Igatpuri Carnage Were Buried Alive Say Cops

नवा खुलासा, लैलाच्या फार्महाऊसवर दोघांना जिवंत गाडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लैला खान हत्याकांडात रोज नवे खुलासे होत आहेत. इगतपूरी येथील लैला खानच्या फार्महाऊसवर दोघांना जिवंतच दफन केले असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा खुद्द मुख्य आरोपी परवेझ इक्बाल टाक याने पोलिस चौकशीत केला आहे. टाकने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार त्याने सहा जणांना पुरले त्यातील दोघे पूर्णपणे मेलेल नव्हते. त्यांना पुरण्यात आले तेव्हा त्यांचा श्वास चालू होता. या दोघांचा श्वासोच्छ्वास सुरु असल्यामुळेच त्यांच्यावर प्रथम माती आणि दगड टाकण्यात आले आणि त्यानंतर त्यावर शहाबादी फरशी टाकण्यात आली. हे दोघे जरी जिवंत असले तरी, त्यांना बाहेर येता येऊ नये यासाठी असे केल्याचे टाकने सांगितले.
मंगळवारी पोलिसांना लैला खानच्या फार्महाऊस येथील गड्ड्यातून ६ सांगाडे सापडले होते. या सांगाड्यांची ओळख डीएनए अहवाल आल्यानंतरच होणार आहे. मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलकडे हे सांगाडे पाठवण्यात आले आहेत. शुक्रवारी मिळालेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनूसार या सहा जणांना मृत्यूआधी मारहाण झाली होती. या सहा सांगाड्यांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले असून त्यांची लिंग चाचणी देखील केली जाणार आहे.
टाकने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, त्याने सर्वप्रथम सेलिनाला रॉडने मारहाण केली. ती जमीनीवर कोसळताच तिची सर्व मुले टाकवर तुटून पडली. दरम्यान टाकने शाकिरला हाक मारली. टाकने सांगितले की, शाकिरने लैला तिची बहिण हजमीना, जारा, भाऊ इम्रान त्यांची नातेवाईक टिलू यांना एका रॉडने जोरदार मारहाण केली. जवळपास दिडतास ही मारहाण सुरु होती. त्यानंतर टाक आणि शाकिरने सर्वांना गड्ड्यात पुरले. मात्र त्यांना पुरत असतांना दोघांचा श्वास सुरू होता.
क्राईम ब्रँचचे अधिकारी टाकच्या दाव्याची फॉरेन्सिक टेस्ट करण्याच्या तयारीत आहेत. तसेच फार्महाऊस येथून मिळालेल्या सांगाड्यांची टॉक्सिकोलॉजी टेस्ट देखील केली जाणार आहे. ज्यामुळे लैला आणि तिच्या कुटूंबियांना ड्रग्ज देऊन तर मारले नाहीना, याचाही तपास केला जाणार आहे. कारण हे हत्याकांड म्हणजे क्षणात आलेला राग आणि त्यानंतर झालेली मारहाण नसून, एक मोठा कट असल्याची पोलिसांना शंका आहे.
मुंबई गुन्हे शाखा विभागाचे सहायक आयुक्त हिमांशू रॉय म्हणाले, दोन जणांनी सहा जणांची हत्या कशी केली अशी अनेकांनी शंका उपस्थित केली. त्यामुळे पोलिसांनी ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभ‍िनेत्री लैला खानचा पती वफी खानला मुंबई एअरपोर्टवर अटक
लैला खान हत्याकांड: डीएनएसाठी सांगाड्यांचे नमुने पाठविले- हिमांशू रॉय
लैला खान हत्याकांड : इगतपुरीतील दोन ड्रायव्हर ताब्यात