आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At Mitmita Safari Park Work Starts This Year Minister Kadam

सुखद सोमवार: मिटमिटा सफारी पार्कचे काम यंदाच सुरू होणार, मंत्री कदम यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद जवळील मिटमिटा सफारी पार्कचे तीन वर्षांपासून अडलेले घोडे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही परिस्थितीत यंदाच या पार्कचे काम सुरू करू, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दै. 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. सफारी पार्क कसे असावे याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: सूचना करणार असून, त्यांच्या कल्पनेप्रमाणेच ते उभारले जाईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद मनपाच्या प्राणिसंग्रहालयासाठी पडेगाव- मिटमिटा येथील गट नंबर ३०७ मधील ४० हेक्टर जमीन मिळावी म्हणून मूळ प्रस्तावाची प्रत पुन्हा एकदा २१ मे रोजी पाठवण्यात आलेली आहे. खरे तर २ फेब्रुवारी २००७ रोजीच औरंगाबाद मनपाने या जागेचा ठराव करून प्रस्ताव मंत्रालयात पाठवला होता. परंतु ही फाइल पुढे सरकतच नव्हती. मनपा जागेची पूर्ण रक्कम देण्यास तयार असूनही महसूल विभाग त्याकडे लक्ष देत नव्हते.
उद्धव यांच्या कल्पेनतून साकारणार सफारी पार्क
मनपाचे छोटे प्राणिसंग्रहालय पार्कमध्ये मोठे करण्याची योजना होती. परंतु जागा मिळत नसल्याने पार्क उभे राहत नव्हते. पण आता जागा मिळवण्याचा प्रयत्न असून, लवकरच ती ताब्यात येईल. आमची योजनाही तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पार्कबाबत काही कल्पना आहेत. त्यांना घेऊन जागेचा दौरा करण्यात येईल. त्यांच्या कल्पनेनुसार नवी योजना तयार करून काम सुरू करू.
रामदास कदम, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र

कसे असेल सफारी पार्क
> सध्याच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वन्य प्राणी बिबटे, वाघ सिंह असतील. काही प्राणी नव्याने आणले जातील.
> अनेक पशुपक्षी असतील. परदेशातून प्राणी आणले जातील. वाजवी प्रवेश फी असेल..
> सर्व प्राणी खुल्या वातावरणात ठेवले जाईल. परदेशात जाळीच्या गाडीतून प्राणी पाहण्याची सोय असते तशी येथे असेल.
> पार्कच्या रस्त्यानेच पुढे वेरूळ, म्हैसमाळ, दौलताबाद ही पर्यटन स्थळे पर्यटकांना पाहता येतील.