मुंबई- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानातर्गंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मुंबईतील खार रेल्वे स्थानकाबाहेर स्वच्छतेसाठी हातात झाडू घेऊन फिरवला. या स्वच्छता अभियानात मुंबईतील खासदार पुनम महाजन यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज संपुर्ण देशभर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुंबईच्या विविध भागात हे अभियान राबविले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा हे आज मुंबई दौ-यावर असून ते खार रेल्वे स्थानकाबाहेर या अभियानात सहभागी झाले. अमित शहा यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यानी हातात झाडू घेवून सफाई करीत या आंदोलनातील
आपला सहभाग नोंदविला. भारत माता की जय… अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता.
यावेळी शहा म्हणाले, देशातील जनमस्येचे जनआंदोलनात परिवर्तन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. हे देशव्यापी जनआंदोलन व्हावे आणि त्यामध्ये सर्व सामाजघटक, राजकीय पक्ष, समासेवी संस्थांसह सर्वानी सहभागी व्हावे. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्याची संकल्पना मांडली. हे अभियान म्हणजे जनसमस्येला एका अभियानात परिवर्तन करण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली आहे. आता हे अभियान जनआंदोलन होण्याची गरज आहे.
पुढे पाहा, अमित शहा व खासदार पूनम महाजन यांचे स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेले क्षणचित्रे...