आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Atem Girl Rakhi Sawant Join In Rpi Party, Mp Athavele Welcomed Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राखी सावंत आरपीआयमध्ये, खासदार आठवलेंच्या उपस्थितीत केला प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयटम गर्ल व बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंत हिने आज (शनिवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी राखी सावंत हिचे पक्षात स्वागत केले. तसेच राखीकडे रिपब्लकीन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची राष्ट्रीय महिला विभागाची कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याची घोषणा केली.
समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे राखीने खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सांगितले. राखी सावंत ही एका पोलिस हवालदाराची मुलगी आहे. लहानपणापासून तिने संघर्ष पाहिला आहे. एवढेच नव्हे तर तथाकथित उच्चभ्रू समाजाने सामावलेल्या बॉलिवूडमध्येही या मराठमोळ्या दलित मुलीला मोठा संघर्ष करावा लागला.
ब-या-वाईट अनेक बाबींचे चटके सोसल्यानंतर राखीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपमधून तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने स्वतंत्र पक्ष स्थापून लोकसभा निवडणूक लढविली. मात्र, राखीचा दारूण पराभव झाला. त्यामुळे राखीने काही दिवसातच आपल्या पक्षाचे विसर्जन केले. अखेर राखीने आज खासदार आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये प्रवेश केला. राखीने मागील आठवड्यात आठवलेंची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात भेट घेतली. त्यावेळी पक्ष प्रवेशाबाबत दोघांत चर्चा झाली होती.
(फाईल फोटो)